आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी मा. श्री.हिरालाल सोनवणे (भा.प्र.से.) आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा राज्य मुख्य आयुक्त महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् यांनी राज्य कार्यालय मुंबई येथे सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांच्या समवेत मा.श्री.नवनाथ बी. फरताडे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग मुंबई. उपस्थित होते.
मा. राज्य चिटणीस श्री.अरुण सपताळे. यांनी मा. आयुक्त यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे मा.श्री.नवनाथ बी. फरताडे यांचे स्वागत श्रीमती शुभांगी तेंडोलकर, यांनी केले.
या प्रसंगी राज्य सहचिटणीस श्रीमती सारिका बांगडकर, राज्य प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट) श्री.चंद्रकांत फुलपगारे राज्य संघटन आयुक्त (गाईड) श्रीमती सीमा चाळके, स्थापत्य अभियंता श्री. प्रमोद पाटील, अधीक्षक श्री. संतोष दुसाने, लेखापाल श्री. नितिन गायकवाड, जनसंपर्क अधिकारी श्री. प्राजक्त जामक व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
मा. राज्य चिटणीस यांनी स्काऊट गाईड विषयी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत मा. राज्य मुख्य आयुक्त यांना माहिती दिली व चळवळीमध्ये कोणकोणते उपक्रम होतात याबाबत सविस्तर माहिती दिली.
मा. आयुक्त महोदय यांनी माझ्याकडून जास्तीतजास्त प्रगतिशील स्काऊट गाईड चळवळ होण्यासाठी सहकार्य असेल असे आश्वासन दिले.



Leave a Reply