Maharashtra State Bharat Scouts And Guides Rajyapurskar Testing Camp

ऑनलाईन राज्यस्तरीय राज्यपुरस्कार स्काऊट गाईड चाचणी शिबिर राज्यसंस्थेच्या वतीने आज दिनांक २९.०६.२०२१ रोजी आयोजित करण्यात आले. सदर शिबिरत सहा जिल्हे सहभागी होते, एकूण ३२ स्काऊट व ५५ गाईड यांनी सहभाग घेतला. ऑनलाइन राज्य पुरस्कार चाचणी शिबिर अतिशय शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक करण्यासाठी सर्व परीक्षक व वेबसाईट संचालक यांनी सहकार्य केले. स्काऊट विभागाचे शिबीर प्रमुख श्री. गिरीश कांबळे (STC.S) व गाईड विभाग शिबीर प्रमुख श्रीमती किशोरी शिरकर(STC.G) यांनी नेतृत्व केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी राज्य संघटना आयुक्त श्री. प्राजक्त जामकर व श्रीमती सरिता पाटील यांचे सहकार्य मिळाले.
ऑनलाइन राज्य पुरस्कार शिबिराला श्री. संजय महाडिक राज्य चिटणीस (अ.का) यांनी शुभेच्छा दिल्या.

 Leave a Reply