- October 11, 2017
- Posted by: Administrator
- Category: News
महाराष्ट्रातील १५लाख स्काऊटस आणि गाईडस यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदविला तर महाराष्ट्र स्वच्छ होईल: मा. राज्यपाल विद्यासागर राव
भारतातील संपूर्ण स्काऊटस आणि गाईडस नोंदणी पैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ लाखाच्यावर स्काऊटस आणि गाईडस यांची नोंदणी केवळ महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडसची आहे. ही अतिशय आनंदाचची आणि अभिमानाची बाब आहे. स्काऊट गाईड चळवळीची समाजाला अतिशय गरज आहे, युवकांच्या विकासाच्या विचार करून लार्ड बेडन पॉवेल यांनी ही चळवळ सर्व जगभर सुरु केली. स्वच्छ भारत अभियानचा उपक्रम नेहमीकरिता राबवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक कार्यक्रमाला मी उपस्थित असतो पण स्काऊटस आणि गाईडसचा कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ठ रीतीने नियोजन केले असून मुलांवर सुसंस्कार करणारा हा कार्यक्रम आहे असे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.
महाराष्ट राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस संस्थेतर्फे दिनांक ०९ ऑक्ट २०१७ रोजी स्काऊटस आणि गाईडस पेव्हीलियन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे आयोजित सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन वर्षाच्या राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभात मा. राज्यपाल विद्यासागर राव बोलत होते. मा. Adv. आशितोष कुंभकोणी, महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य हेही या प्रसंगी उपस्थित होते.
स्काऊट आणि गाईड चाल्वालीस अधिक चालना देऊन विकास करणारे राज्य मुख्यआयुक्त श्री भा. ई. नगराळे, भा. प्र. से. ( निवृत्त) हे कौतुकास पात्र आहे असे गौरोद्गर त्यांनी या प्रसंगी काढले.
राज्य मुख्यआयुक्त श्री भा. ई. नगराळे, भा. प्र. से. ( निवृत्त) यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमाबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य भारत राज्य स्काऊटस आणि गाईडस संस्थेतर्फे आयोजित राज्यपुरस्कार चाचणी शिबिरात उत्तीर्ण झालेल्या स्काऊटस आणि गाईडसना मा. राज्यपाल महोदयाच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्काऊटस आणि गाईडचे कार्य आयुष्यभर निष्ठेने स्वीकारलेल्या श्रीमती मंगला उकिडवे, पुणे आणि श्री. बी. आर. शहा, उत्तर मुंबई उपनगर यांना प्राध्यापक टी. पी. महाले स्काऊट गाईड जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.